नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, ‘जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी प
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: भाजप पक्ष वाढवण्यात गेल्या 40 वर्षात अनेक नेत्यांचे योगदान लाभले आहे. त्यापैकी एकनाथ खडसे एक आहेत. 40 वर्षे त्यांनी भाजपच्या (BJP) विस्तारासाठी काम केले. काही चुका झाल्या असतील, म्हणून अमित भाई शहा (Amit Shah) यांनी काही चर्चा केली असती तर मला माहित नाही. नेते-कार्यकर्ते जीव लावून काम करत होते. काळाच्या ओघात काही घटना घडल्या आणि ते पक्षाच्या बाहेर गेले. आपल्या घरचे लोक बाहेर जाण योग्य नाही. त्यांना परत पक्षात घ्यायचे का नाही याबद्दल राष्ट्रीय नेतृत्वाने निर्णय घ्यावा, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)
भाजप वाढवण्यासाठी योगदान दिले त्यापैकी एक खडसे साहेब आहेत. काही अडचणी निर्माण झाल्या. ते पक्षाच्या बाहेर गेले. जेव्हा पक्षात काही नव्हतं, त्यावेळी ज्यांनी जीव लावून पक्षासाठी काम केलं, त्यापैकी एक खडसे साहेब आहेत. ते बाहेर गेले तेव्हा मी म्हटलं होतं की, पक्ष वाढेल मोठा होईल. पण घरचे लोक बाहेर जाणं काही योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांबाबतही बोलले. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. ते अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावे, ही सदिच्छा आहे. त्यांनी वारंवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
BJP meeting: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक
महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री आठ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील व इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही कोअर कमिटी बैठकीला हजेरी लावणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, राज्यातील संघटनात्मक बाबी, रखडलेल्या नियुक्त्यांसह पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होईल.
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Comments are closed.