ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरण! खासदार सोनवणेंनी घेतली कुटुंबियांची भेट, आरोपींना फाशीची मागणी
बीड वार्ता: बीड जिल्ह्यातील पाळलेल्या गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीकाँग्रे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले. ज्ञानेश्वर वाकडे प्रकरणात कोणता तरी बॉस आहे, तो बाहेर काढला पाहिजे असेही बजरंग सोनवणे म्हणाले. पट्टी वडगाव येथील तरुण ज्ञानेश्वर वाकडे याची शनिवारी रात्री निर्गुण हत्या करण्यात आली होती. आज खासदार बजरंग सोनवणे यांनी वाकडे कुटुंबीयांची पट्टीवडगाव येथे जाऊन भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. यामध्ये विवेक तारसे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणातील बॉस कोण आहे हे समोर आलं पाहिजे
पट्टी वडगाव येथील तरुण ज्ञानेश्वर वाकडे याची शनिवारी रात्री निर्गुण हत्या करण्यात आली होती. आज खासदार बजरंग सोनवणे यांनी वाकडे कुटुंबीयांची पट्टीवडगाव येथे जाऊन भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. बीड जिल्ह्यात दर एक दिवसाआड काही न काही घटना होत आहे. बीड जिल्ह्यातले जे पाळलेले गुंड आहेत त्यांच्यावर एम पी डी अंतर्गत कारवाई झाल्याशिवाय हे सुधारणार नाहीत. यासाठी मी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे देखील भेट घेणार असल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले. खोकले नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने या कुटुंबाला वेठीस धरल्याचे कुटुंबियांनी सांगितले तर या प्रकरणातील शनिवारी जखमी झालेल्या विवेक तारसे या तरुणाला रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्राथमिक उपचार केले गेले आता त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील बॉस कोण आहे हे समोर आलं पाहिजे. वाकडे कुटुंबाला न्यायला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी कोण आहेत त्यांनाही शिक्षा भेटली पाहिजे. दरम्यान जयंत पाटील आणि सुरेश यांच्यातील वादावर बोलण्यास खासदार बजरंग सोनवणे यांनी टाळले.
धारदार चाकूने सपासप वार करत केली निर्घृण हत्या
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्री किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्याकांडात झाले होते. साठे चौकात काही जणांनी 21 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या मित्राने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Comments are closed.