पहिल्याच वनडेत इंग्लंडला नमवलं; पण वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला दोषी आढळला, आयसीसीची चेतावणी, कारण काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 14 जुलै रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. परंतू या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्या खात्याक एक डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला आहे. गुरनूरने आपली चूक मान्य करत मॅच रेफ्री रिची रिचर्डसन यांनी सुनावलेली शिक्षा स्वीकारल्यामुळे या प्रकरणी कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.

सामन्यातील आठव्या षटकात गुरनूरने चेंडू अडवून तो फलंदाजाच्या दिशेने अत्यंत अयोग्य आणि धोकादायक पद्धतीने फेकला. त्याच्या या कृतीमुळे त्याच्यावर आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या शिस्तभंग रेकॉर्डमध्ये एक ‘डिमेरिट’ पॉइंट (demerit point) देखील जोडला गेला आहे. सामना पंच कुमार धर्मसेना आणि माईक बर्न्स यांच्यासह तिसरे पंच सॅम नोगाज्स्की आणि चौथे अधिकारी रसेल वॉरन यांनी गुरनूर विरुद्ध ही तक्रार नोंदवली होती. आयसीसीच्या नियमांनुसार, ‘लेव्हल 1’ च्या अंतर्गत येणाऱ्या अशा गुन्ह्यांसाठी खेळाडूला किमान ताकीद दिली जाते किंवा त्याच्या सामन्याच्या मानधनातून 50 टक्क्यांपर्यंत कपात केली जाऊ शकते, तसेच एक किंवा दोन डिमेरिट गुण दिले जातात. गुरनूर ब्रारचा मागील 24 महिन्यांतील हा पहिलाच गुन्हा आहे. मात्र, जर एखाद्या खेळाडूच्या खात्यात 24 महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट गुण जमा झाले, तर त्याचे निलंबन केले जाऊ शकते.

Comments are closed.