धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सपकाळ यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. नीटचा पेपर पहिल्यांदा फुटलेला नाही, यापूर्वी 70 पेपर फुटलेले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी जोरदार पद्धतीनं केली आहे. सोनम वांगचुक पहिल्यांदा उपोषणाला बसलेले नाहीत. ते यापूर्वी लडाखच्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांचे अधिकार अबाधित ठेवावेत यासाठी ते उपोषणाला बसले होते. लडाखच्या स्थानिकांच्या अधिकारासाठी ते मागणी करत होते.

मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल का घेत नाहीत?

सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत, काँग्रेस नेते आज तिथे गेले असले तरी आमचे आणि त्यांचे मुद्दे एक आहेत. मूळ मुद्दा हा आहे नरेंद्र मोदी का गेले नाहीत, मोदींनी का दखल घेतली नाही? मूळ मुद्दा मंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही हे आपण विचारायला तयार नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं. मूळ मुद्दा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या उपोषणाची दखल नरेंद्र मोदी का घेत नाहीत, असा असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

रामाच्या मंदिरात चोरी झालीय हे मोठ्या प्रमाणावर झालं आहे. चोरी करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. चोरी करणारे भाजपशी घनिष्ठ संबंधित होते. चोरी करणाऱ्यांची नियुक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींनीच भूमिपूजन केलं, त्याचं उद्घाटन केलं. नरेंद्र मोदी यांनीच राम मंदिराचा कारभार माहितीच्या अधिकारापासून बाजूला ठेवलं आहे.  चोरी झालेली असताना चुप्पी का साधलेली आहे, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक स्वरुपात राम मंदिर चोरी प्रकरणाची चौकशी व्हावी हा मूळ मुद्दा आहे. या मुद्याला भाजप आणि आरएसएसकडून बगल दिली जात आहे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. रामरक्षेच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आरएसएसला निमंत्रण दिलं आहे. त्यांच्यात धमक आणि खरेपणा असतील तर ते येतील असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आलं आहे. समृद्धी महामार्ग करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत. लाडकी बहीणचे 2100 रुपये करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याकरिता त्यांच्याकडे पैसे नाहीत. दुबार पेरणीला पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे तरतूद नाही. मात्र, शक्तीपीठ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हेदेखील वाचा

Comments are closed.