रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, ‘भरत गोगावले पालकमंत्री

अदिती तटकरे: राज्यात महायुती सरकार (Mahayuti Government) सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यामध्ये सातत्याने जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री आदिती तटकरे तर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हे या पदासाठी कमालीचे आग्रही राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, आता खुद्द मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Aditi Tatkare: नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरे म्हणाल्या की, “आता तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे. आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील, या आधी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज दोन मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे, या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते.”

Aditi Tatkare: लाडकी बहीण योजनेवर विरोधकांची टीका, आदिती तटकरे म्हणाल्या…

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीय. याबाबत आदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, अनेकांच्या कागदपत्रात आणि ई-केवायसीमध्ये तफावत आहे. शिवाय अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि वाहने असलेल्या महिलांना वगळून सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून अन्य पात्र महिलांनी देखील ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. राज्यातील सर्व डीबीटी केंद्रांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये लाडकी बहीणसह नमो शेतकरी योजनांचा देखील सहभाग आहे. राज्यांतील कोणत्याही महिलांना वगळत नसून जास्तीत जास्त महिलांना या योजनांचा लाभ देण्यात येतोय. त्यामुळे कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय झाला नसून लाडकी बहीण योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेपैकी एक योजनेचा तरी लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Jayant Patil on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, ‘लोकशाही मार्गाने…’

Comments are closed.