जे रामाचे नाही त्याचा उपयोग नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या दानपेटी चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहेत. आज नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींना शेवटी हे लक्षात आलं की ‘जो राम का नही, वो किसी काम का नही’. ते रामाकडे परत गेले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे फडणवीस म्हणाले. पण केवळ राजकीय कार्यक्रम न करता त्यांनी यावेळी तरी थोडी का होईना रामरक्षा वाचावी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो असे ते म्हणाले.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे शिरूर हडपसर यवत तळेगाव चाकण शिक्रापूर या उन्नत महामार्गाच भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळ आणि ओएमआर शीटमधील तफावतीबाबत मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारलं असता ते म्हणाले की ही परीक्षा अत्यंत वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. जर कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा पालकाला गुणांबाबत किंवा ओएमआर शीटबाबत काही तक्रार असेल, तर त्यांनी थेट संबंधित यंत्रणेकडे जाऊन आपली तक्रार मांडावी. टीव्हीवर अशा प्रकारची एका विद्यार्थ्याची बातमी मी पाहिली असली तरी संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक असून विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा अस यावेळी ते म्हणाले.
आजच्या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज भूमिपूजन झालेल्या तिन्ही प्रकल्पांमुळे चाकण-शिक्रापूर, हडपसर-यवत आणि पुणे-शिरूर महामार्ग तसेच पुणे व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. या प्रकल्पांचे नियोजन अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. काही ठिकाणी तब्बल चार मजली रस्ते पाहायला मिळतील. यात सर्वात खाली स्थानिक रस्ता, त्यावर आउटर रिंग रोड, त्यानंतर एलिव्हेटेड रस्ता आणि सर्वात वर मेट्रो धावणार आहे.भविष्यातील गरजा ओळखून मेट्रोचे नियोजन या प्रकल्पांसोबतच एकात्मिक पद्धतीने करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मेट्रोसाठी होणाऱ्या स्वतंत्र खर्चात जवळपास 40 टक्क्यांची बचत होईल असंही ते म्हणाले.
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’
Comments are closed.