Ratnagiri News – शेनाळे देशमुख बागेजवळील दरड कोसळण्याचा धोका कायमच; डोंगराकडील बाजूने सुटलेला भाग आजही तसाच
शेनाळे महसुली गावाच्या हद्दीत देशमुख बागेजवळ अतिवृष्टीमुळे भुस्खलन होऊन डोंगराच्या मातीचा ढीग खाली रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या या मार्गावर गत वर्षी देखील दरड कोसळल्याच्या घटनेमुळे वाहतूक बंद पडल्याची घटना घडली होती. तसे यावर्षीही वाहतूक खंडीत होण्याचा प्रकार घडला गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी ही केवळ तात्पुरती मलमपट्टी करून फक्त रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी पुन्हा दरड कोसळण्याचा धोका कायमच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या दुर्लक्षामुळे या मार्गावर वाहतूक धोक्याची झाली आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावाला जोडणारा राजावाडी लोणंद ते आंबडवे या नावाचा नव्याने राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येत आहे . गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. असा हा मार्ग मंडणगड शहरमार्गे भिंगळोली ,धुत्रोळी मार्गे शेनाळे महसुली गावाच्या हद्दीतून चिंचाळी करत म्हाप्रलकडे जातो या मार्गावर मंडणगड, दापोली तसेच काही खेड तालुक्यातील गावातील लोकांना याच मार्गाचा मुंबई, पूणे ठाणे आदी महत्त्वाच्या शहरांकडे जाण्यासाठी उपयोग होतो असा हा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा मार्ग आहे अशा या मार्गावर शेनाळे गावाच्या महसुली हद्दीतील देशमुख बागेजवळील गतवर्षी कोसळलेली दरड पुर्णपणे साफ केलेली नव्हती दरड कोसळल्यानंतर केवळ रस्ता वाहतूकीसाठी खुला केला . यावर्षीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे जरा जरी अतिवृष्टी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा दरड कोसळून रस्त्यावर दगड मातीचा ढिगारा जमा होण्याची शक्यता अधिक असल्याने या मार्गावरील वाहतूक असुरक्षित अशीच आहे.
शेनाळे येथील जाणारा देशमुख बागेजवळील रस्ता हा तीव्र चढ उताराचा असल्याने या रस्त्याच्या डोंगराकडील बाजूची मोठ मोठाली झाडे ही तोडण्यात आल्याने येथील डोगरातील मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपुष्टात आली आहे त्यामुळे जरा जरी पाऊस झाला तरी माती भुसभुशीत होते आणि डोंगराची माती खाली रस्त्यावर येते त्यामुळे या रस्त्याच्या डोंगराकडील भाग आधीच रस्ता कपातीमुळे सैल झाला आहे. त्यामुळे येथे संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. संरक्षक भिंत उभारणे वगैरे ही लांब प्रकिया झाली मात्र सध्या सद्यस्थितीत महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक सुरू होण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी न करता पुन्हा रस्त्यावर मातीचा ढीग येऊन रस्ता बंद पडणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक बाब आहे.
Comments are closed.