शेतकऱ्याच्या ताटात माऊलीची वारी…

देवशयनी आषाढीला पंढरीच्या पांडुरंगाला डोळा भरून पाहता यावे.. त्याचे दर्शन घेता यावे.. त्याच्या समचरणाशी लीन होता यावे यासाठी महाराष्ट्राच्या गावाखेडय़ातून माऊली माऊली.. च्या गजरात लाखो वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. पण ज्यांना पंढरपूरला जाता आले नाही त्यांचे काय? बोटात चित्रांची जादू असलेले मुरबाडमधील कलावंत शेतकरी सचिन पोतदार यांनी घरात बसूनच ताटात वारीचे चित्र रेखाटले आहे. ‘आम्ही काय पुणाचे खातो रे.. तो पांडुरंगच आम्हाला देतो रे..’ असे सांगत मी अन्नाच्या ताटातच पांडुरंग पाहिल्याची भावना चित्रकार सचिन पोतदार यांनी व्यक्त केली. याआधी पोतदार यांनी पळसाच्या पानावर आणि भाकरीवर छत्रपती शिवरायांचे चित्र साकारले होते.
Comments are closed.