लोकशाहीचा आदर्श सांगणारा देश मोदीतंत्र कधी झाला? मोदींनी देशाची माफी मागावी : सचिन सावंत

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घाडमोडींवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी : सचिन सावंत

बहिऱ्या सरकारचे कान उघडले पाहिजेत. ज्या पद्धतीनं अमानुषपणे निष्पाप विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिक शॉक दिले, विद्यार्थिनींचे कपडे फाडलेले दिसतात, ते पाहता नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी होती, असं काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले. आपल्या विद्यार्थ्यांवर, देशाच्या भविष्यावर न्याय मागतात म्हणून हल्ला करत आहात कारण ते न्याय मागत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देशाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं होतं. गुलामाप्रमाणां वागणूक सरकाकडून दिली जात आहे. हे लोकतंत्र आहे की मोदीतंत्र झालेलं आहे. लोकशाहीची हत्या गेल्या 12 वर्षात हळूहळू करण्यात आली त्याचा परिणाम दिसत आहे, असंही सावंत यांनी म्हटलं.

20-21 दिवस सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत, त्यांचा एक प्रतिनिधी जाऊ नये इतकी निष्ठूरता कशी आली. ही लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी बनवलेले राज्य आहे, हे मोदींचं राज्य कधीपासून झालं? प्रत्येक सरकारनं विनम्र असण्याची आवश्यकता आहे. जगाला लोकशाहीची आदर्श परंपरा घालून देणाऱ्या देशाची तुलना उत्तर कोरिया आणि चीनबरोबर करण्याची परिस्थिती आली आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

विद्यार्थ्यांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांना लाज वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारची भाषा वापरली जातेय. हे कडकनाथ घेऊन आलेत का, असा सवाल सचिन सावंत यांनी केला. आंदोलकांमध्ये काही लोकांना घुसवायचं आणि जाणीवपूर्वक घोषणा द्यायला लावायच्या हे भाजपचं टूलकीट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, मोदींनी देशाची माफी मागावी यासाठी राहुल गांधी यांनी आंदोलन सुरु केलं आहे. मोदी सरकार डरती है पोलीस को आगे करती है, अशी स्थिती असल्याचं सचिन सावंत म्हणाले.

काँग्रेस पक्षानं इंग्रजांशी लढाई लढलेली आहे, पहिले लढे थे गोरोंसे अब लढेंगे चोरोंसे असं सचिन सावंत यांनी म्हटलं. गेल्या दोन महिन्यांपासून नीटच्या प्रश्नावर आंदोलनं सुरु करण्यात आली आहेत.  लोक स्वत:हून बाहेर पडत आहेत आणि विरोध करत आहेत म्हणून राज्य सरकारनं जमावबंदीचा आदेश दिला म्हणजे ते किती घाबरले आहेत, असं सचिन सावंत म्हणाले.

हेदेखील वाचा

Comments are closed.