पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पा

पुणे : पुण्यात वेश्या व्यवसायातून ९ मुलींची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय (Pune Crime News) सुरू होता अशी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Crime News) गुन्हे शाखेने कारवाई करत या मुलींची सुटका केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा करून त्या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देहव्यापारासाठी (Pune Crime News) आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी राकेश राजू पाटोळे व मंगेश व्यंकट बनसोडे यांना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीविरुद्धही आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: लॉजवर छापा टाकला अन्….

नवले पूल परिसरात सुरू असलेल्या देहव्यापारावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने धडक कारवाई करत नऊ महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून राकेश राजू पाटोळे (वय २७, रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी) आणि मंगेश व्यंकट बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई  सोमवारी (दि. २०) आंबेगाव बुद्रुक, कात्रज-आंबेगाव रोड, नवले पुलाजवळ करण्यात आली.(Pune Crime News)

या लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतरलॉजवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान देहव्यापारासाठी आणलेल्या नऊ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच रिक्षाचालक राकेश पाटोळे आणि लॉज व्यवस्थापक मंगेश बनसोडे यांना अटक करण्यात आली. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणखी वाचा – Sunetra Pawar and Ajit Pawar : ‘माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला….’,अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!

हेदेखील वाचा

Comments are closed.