हात धरुन स्वागत केलं, खळखळून हसले; शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं?

दिल्लीत शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर देशभरात केंद्र सरकारविरोधात नाराजीची लाट असताना आता दिल्लीत एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. आज (22 जुलै) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीला पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यादेखील उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या कक्षात ही भेट झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना अगदी हाताला धरुन आत आणले आणि त्यांचे स्वागत केले. या दोघांचे मनमोकळेपणाने हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटोही समोर आले आहेत. विद्यार्थी आंदोलनावरुन कधी नव्हे ते मोदी सरकार कोंडीत सापडले असताना शरद पवार यांची अचानक पंतप्रधानांची भेट का घेतली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Sharad Pawar Meet Narendra Modi At Delhi)

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडीए आघाडीत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात महायुती सरकारच्या सत्तेत वाटा मिळणार असल्याचेही सांगितले जाते. जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी वर्षा बंगल्यावर अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील उपस्थित असल्याची चर्चा होती. या सगळ्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपशी हातमिळवणी करुन एनडीएत जाणार, या चर्चेला बळकटी मिळाली होती.

शशिकांत शिंदे काय म्हणाले? (Shashikant Shinde On Sharad Pawar Narendra Modi Meet)

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारले असता, मला काही माहिती नाही. पण शरद पवारांचा जो काही अनुभव पाहता दिल्लीतील आंदोलनावरील मार्ग काढायला गेले असतील. शरद पवार काल विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला जंतर मंतरवर गेले होते. यावेळी शरद पवार अभिजीत दीपकेंना भेटले आणि त्यांना पाठिंबा दिला.  आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे नरेंद्र मोदींसोबत चर्चा करायला आणि मार्ग काढावा म्हणून गेले असतील. त्यासंदर्भात बैठक असेल, असे मला वाटते. राजकीय चर्चा त्यापलीकडे नाही, असं शशिकांत शिंदेंनी सांगितले.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, चर्चेला उधाण, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Rahul Gandhi PM Modi house: पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी

Comments are closed.