संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोघांना अटक
कल्याण क्राईम न्यूज : कल्याणमधील बेपत्ता झालेल्या शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे शाखेला यश आले आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या मित्राने प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
14 जुलै रोजी कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणाऱ्या शिक्षिका संगीता चंदनशिवे या नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना आसनगाव येथे एलआयसीच्या कामानिमित्त जायचे असल्याचे त्यांनी काही नातेवाईकांना सांगितले होते. मात्र त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. दरम्यान, चार दिवसांनंतर संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले.
मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसेही काढले
तपासादरम्यान, मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून घोटी येथे पैसे काढण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तपासानुसार, गोकुळ आव्हाड हा संगीता चंदनशिवे यांचा परिचित असून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होते. संगीता चंदनशिवे यांच्या मालमत्तेवर हक्क मिळावा यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता. मात्र त्यांनी त्यास नकार दिल्याने त्याने कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुळ आव्हाड याने आपल्या साथीदार तुषार पारखे, विनोद पांडे आणि संतोष जाधव यांच्या मदतीने संगीता चंदनशिवे यांना विश्वासात घेऊन घोटी परिसरात नेले. तेथे त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपीला घोटी पोलिसांनी अटक केली आहे तर एका आरोपीच्या शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील मोरे परिसरात राहणाऱ्या शिक्षिका संगीता चंदनशिवे 14 जुलै रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. आसनगाव येथे एलआयसीच्या काही कामानिमित्त जायचे असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. मात्र, रात्र झाली तरी त्या घरी परतल्याच नाहीत. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. शिक्षिकेचा शोध सुरू असतानाच चार दिवसांनी घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे बेपत्ता झाल्याच्या तक्रारीला हत्येचे भयानक वळण मिळाले. तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागला. मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून घोटी भागात पैसे काढण्यात आले होते. पोलिसांनी तत्परतेने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Comments are closed.