काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर मह

दिल्ली जंतरमंतरवर CJP च्या निषेधार्थ नरेंद्र मोदी: गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन (NEET Exam Paper Leak) जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झाली नाही. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज एक्सवर पोस्ट करत काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. (Narendra Modi on CJP Protest)

देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल. यासंबंधी संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही. (Narendra Modi on CJP Protest)

सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजूनही चर्चा नाही- (CJP Protest Delhi Jantar Mantar)

दिल्लीतील जंतरमंतरवरील काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची, गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी चर्चा झाली नाही. तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाची कोंडी कधी फुटते हे पाहावं लागेल.

ही बातमीही वाचा:

Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

Comments are closed.