गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्…; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाह

पुणे: पुण्यातील शिरूर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या पिंपळसुटी गावात बुधवारी (२२ जुलै) पहाटे एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू (Pune Leopard Attack) झाला. भाग्यश्री संदीप वारे (वय ५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. भाग्यश्री ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडीच्या कामासाठी पिंपळसुटी येथे वास्तव्यास होती. हे कुटुंब शेतातील गोठ्याजवळ झोपलेले असताना, पहाटे पावणेतीनच्या सुमारास बिबट्याने (Pune Leopard Attack) अचानक या चिमुकलीवर हल्ला केला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आई-वडील तात्काळ जागे झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिला उसाच्या शेतात ओढून नेले होते.(Pune Leopard Attack)

घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असता, उसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह (Pune Leopard Attack) आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पु ढील वैद्यकीय तपासणीसाठी (Pune Leopard Attack) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पिंपळसुटी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची (Pune Leopard Attack) ही दुसरी घटना असून, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या (Pune Leopard Attack) हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचा दावा केला जात आहे.(Pune Leopard Attack)

Pune Leopard Attack :  वन विभागाविरोधात ग्रामस्थांचा संताप

वारंवार अशा भयंकर घटना घडूनही बिबट्यांचा वावर आणि हालचाली रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरात तात्काळ पिंजरे उभारणे, नियमित गस्त वाढवणे आणि बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करणे, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत. (Pune Leopard Attack)

Pune Leopard Attack :  बाधित कुटुंबाला आर्थिक मदत; वन विभागाकडून उपाययोजना

घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक उपवनसंरक्षक राजहंस तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, मृत मुलीच्या (Pune Leopard Attack) कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावणे, कॅमेरा ट्रॅप बसवणे, ड्रोनद्वारे पाहणी करणे आणि रात्रगस्त वाढवण्याचे काम वन विभागाकडून केले जात आहे. (Pune Leopard Attack)

हेदेखील वाचा

Comments are closed.