केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे
मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रात नव्या शिक्षण मंत्र्यांच्या नावाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या शर्यतीत महाराष्ट्रातून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रतिक्रिया देत, डॉ. श्रीकांत शिंदे हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून दिसावेत, अशी भावना व्यक्त केली आहे.
Shrikant Shinde and Education Minister: “आदित्य ठाकरेंसारखी पहिल्याच टर्ममध्ये मंत्री होण्याची घाई नव्हती”
माध्यमांशी बोलताना सिद्धेश कदम यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, “डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत आणि ते तळागाळातील सच्चे कार्यकर्ते आहेत. ठाकरे यांच्याप्रमाणे पहिल्याच टर्ममध्ये लगेच मंत्री होण्याची त्यांची कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. पहिल्या टर्मपासूनच त्यांनी जमिनीवर उतरून काम केले आहे.”
Shrikant Shinde and Education Minister: तळागाळातील अडचणींची जाण आणि कामाचा अनुभव
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना कदम म्हणाले की, “तळागाळातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींची त्यांना खूप चांगली जाण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर जी काही जबाबदारी सोपवतील, ती ते १०० टक्के क्षमतेने आणि निष्ठेने पार पाडतील, असा विश्वास आम्हाला आहे.”
Shrikant Shinde and Education Minister: “शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्र सक्षमपणे हाताळू शकतात”
नव्या जबाबदारीबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “शिक्षण असो वा आरोग्य, कोणतेही मंत्रालय सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात आहे. ते स्वतः एक ऑर्थोपेडिक सर्जन (डॉक्टर) असल्याने आरोग्य क्षेत्रातील सूक्ष्म विषय आणि आव्हाने अत्यंत प्रभावीपणे हाताळू शकतात. खासदार झाल्यानंतरही त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू ठेवली होती.”
Shrikant Shinde and Education Minister: “एक शिवसैनिक म्हणून कॅबिनेट मंत्री झालेले पाहायला आवडेल”
आपल्या भावना व्यक्त करताना सिद्धेश कदम म्हणाले, “एक शिवसैनिक म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे केंद्रात कॅबिनेट मंत्री झालेले पाहायला नक्कीच आवडेल. त्यांनी देशाच्या शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्राची जबाबदारी भूषवावी आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, हीच आमची इच्छा आहे.”
Shrikant Shinde and Education Minister: आणखी काय-काय म्हणालेत सिद्धेश कदम?
“मला वाटतं श्रीकांत शिंदेजी हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत. ते पहिल्याच टर्ममध्ये काय मंत्री व्हायला खासदार झाले नाहीत. म्हणजे इतर जे बंधू आहेत ठाकरे, ते पहिल्याच टर्ममध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं आणि ते झालेसुद्धा पहिल्याच टर्ममध्ये. पण श्रीकांत शिंदे जी हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत अगोदर. म्हणून त्यांना तळागाळातल्या अडचणीसुद्धा माहिती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना जे काही जबाबदारी आदरणीय मोदी साहेब देतील, ती मला वाटतं ते १००% निभावून नेतील. पण एक शिवसैनिक म्हणून नक्कीच त्यांना आम्हाला कॅबिनेट मंत्री झालेलं बघताना आवडेल. पण त्याचबरोबर शिक्षण मंत्री असो किंवा मग आरोग्य असो… आज आपल्या देशामध्ये आरोग्य खरोखरच त्याच्यामध्ये एक चांगली पोस्ट ही गरज आहे, तर त्यांना आरोग्यसुद्धा जबाबदारी किंवा मग इतर काही युवांच्या निगडित जे काही विषय असतील, मला वाटतं ते १००% पार पाडू शकतील. स्वतः डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. ते खासदार झाल्यानंतरसुद्धा ते प्रॅक्टिस करायचे. तर मला वाटतं शिक्षण असो किंवा मग आरोग्य असो…”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.