धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, ‘या’ तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्या
धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री: नीट पेपर लीक (NEET Paper Leak) प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात पेटलेली ठिणगी आता शांत होण्याऐवजी तिचा वणवा इतर राज्यांत पसरला आहे. दिल्लीतील या घडामोडींनंतर आता आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या तीन प्रमुख राज्यांतील शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
1. आंध्र प्रदेश: जगन मोहन रेड्डी आक्रमक, नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी
वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी जिल्हा निवड समिती भरती परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांवरून आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत जगन मोहन रेड्डी म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आणि राजकीय उत्तरदायित्वाचा एक वस्तुपाठ मांडला. मग सुमारे 3.5 लाख उमेदवारांच्या भविष्याशी खेळणाऱ्या डीएससी परीक्षेशी संबंधित अनियमिततेची जबाबदारी घेऊन नारा लोकेश राजीनामा देणार की मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मुलाचा बचाव करणार?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यावर प्रत्युत्तर देताना नारा लोकेश यांनी म्हटले की, “जे लोक आज नैतिकतेचे धडे देत आहेत, त्यांचा स्वतःचा भूतकाळातील रेकॉर्ड काय सांगतो हे जनतेला चांगले ठाऊक आहे.”
2. तेलंगणा: मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे शिक्षण खात्याच्या राजीनाम्याची मागणी
तेलंगणात भाजप प्रदेशाध्यक्ष एन. रामचंदर राव यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे शिक्षण खात्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ट्यूशन फी री-इम्बर्समेंट योजनेचे प्रलंबित 12,000 कोटी रुपये राज्य सरकार देऊ शकत नसेल, तर शिक्षण मंत्रालय रेवंत रेड्डी यांनी स्वतःकडे ठेवू नये, असा घणाघात त्यांनी केला. सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांशी संबंधित असणारा हा निधी त्वरित वर्ग न केल्यास काँग्रेस सरकारला तीव्र जनआक्रोशाचा सामना करावा लागेल, असा इशाराही भाजपने दिला आहे.
3. पंजाब: ‘फार्मसी’ पेपर लीकवरून आम आदमी पक्ष बॅकफूटवर
पंजाबमध्ये भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी कथित ‘फार्मसी’ परीक्षा पेपर लीक प्रकरणी आम आदमी पक्षाच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लाखो रुपयांच्या देवाणघेवाणीतून हा पेपर लीक झाला असून यामुळे 7,000 हून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप त्यांनी केला. जंतर-मंतरवरील आंदोलनात मनीष सिसोदिया यांनी “आपच्या राज्यात पेपर लीक झाला तर मंत्र्याला हटवू,” असे वक्तव्य केले होते, याची आठवण करून देत सिरसा यांनी ‘आप’च्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली आहे. एकंदरीत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने देशातील राजकीय पटलावर मोठे वादळ निर्माण केले असून, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आता विविध राज्यांतील शिक्षणमंत्र्यांचे पद धोक्यात आल्याचे चित्र आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.