राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं…: संजय शिरसाट
मुंबई : नीट पेपरफुटीवर कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजीत दिपके हा मराठी तरूण चांगलाच चर्चेत आला. संभाजीनगरच्या असलेल्या या अभिजीत दिपकेसंबंधी राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राजकारण हा अभिजित दिपके किंवा त्याच्या कुटुंबीयाचा विषय नाही. परंतु काही लोक अभिजीतला बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला.
मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या अभिजीत दिपकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अभिजीत दिपकेच्या आडून काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला.
दिपकेच्या घरी का भेट दिली?
दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीत दिपकेच्या घरी संजय शिरसाट यांनी भेट दिली. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, अभिजीतला मी लहानपणापासून पाहिलंय.माझा मुलगा त्याच्या बहिणीच्या हातून राखी बांधतो.दिपके हे माझे जवळचे आहे नातेवाईक आहेत आणि मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांची विचारपूस करणे गरजेचे वाटत होते. त्यामुळी मी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ते माझ्या कार्यक्रमाला येतात, मी पण त्यांच्या घरी गेलो. आंदोलन सुरू असताना जर दिपकेच्या घरी भेट दिली असती तर त्यावर चुकीच्या बातम्या आल्या असत्या. कुणाचा मेसेज घेऊन गेलो, याची चर्चा रंगली असती. त्यामुळे आंदोलन झाल्यानंतर आपण दिपकेच्या घरी भेट दिली.
राजकारणाचा विषय नाही
अभिजीत दिपके यांनी माजी मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून खासदारकीची ऑफर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की, अभिजीत दिपकेने भावनिक भरात आंदोलन केलं. पण राजकारण हा त्याचा किंवा त्याच्या कुटुंबीयांचा विषय नाही. अभिजीतने नोकरी करावी आणि सुखात राहावं असं त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे. आता राजकारणात त्याने यावं की नाही हा त्याचा निर्णय त्याने घ्यावा.
अभिजीतला राजकारणात यायचं नाही, पण काही लोक त्याला बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. दिपकेच्या आडून काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. अभिजीत दिपकेने दिल्लीत आंदोलन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात पेढे वाटले जात आहेत, हे दुर्दैवी असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
ही बातमी वाचा:
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.