E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल E20 च्या समर्थनासाठी मैदानात
अहिल्यानगर : नीट पेपरफुटीच्या मुद्यावर कॉकरोच जनता पार्टी, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांकडून नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं. सीजेपीच्या आंदोलनाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. सीजेपीचं आंदोलन संपताच दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर E20 जनता पार्टी स्थापन करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा विरोध वाढू लागला आहे. सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आक्रमक भूमिका घेत E20 ला विरोध करणे म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, E20 ला विरोध करण्यामागे फारमोठे षडयंत्र आहे, असं पाशा पटेल म्हणाले आहेत.
E20 ला विरोध म्हणजे पुढची पिढी संपवणे: पाशा पटेल
आता उसाची मळी,मका, तांदूळ आणि बांबूपासून इथेनॉल बनवतो, त्याचा वापर वाहनात केला तर आपली पुढची पिढी जगणार आहे नाही तर जगणार नाही. आता E20 विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, असं म्हणत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी E20 चे जोरदार समर्थन केले आहे.
E20 ला विरोध करण्यामागे फरमोठे षडयंत्र आहे, या देशात मागच्या 70 वर्षात इथेनॉल येऊ दिले नाही कारण परदेशातून डिझेल पेट्रोल-कोळसा आणताना त्यात पैसे खायला मिळत होते. म्हणून या विशिष्ट लॉबीने शेतकऱ्यांच्या इथेनॉलला विरोध केला, असं पाशा पटेल म्हणाले.
ब्राझील सारख्या देशात 100 टक्के इथेनॉलवर वाहने चालतात याचा तर आपल्या देशातील नागरिकांनी विचार करायला हवा. E20 ला विरोध करताना आल्या मुलाचा चेहरा बघावा, आपला मुलगा जिवंत राहणार आहे की नाही याचा विचार करावा, असं पाशा पटेल यांनी म्हटलं.
इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते ही खरी गोष्ट आहे, त्याबाबत दरासंदर्भात दिलासा देता येऊ शकतो. मात्र गाडीचे इंजिन खराब होते हा दावा चुकीचा आहे. आता फ्लॅक्स इंजिन येत आहेत, त्यात 85 टक्के इथेनॉलवर गाड्या चालवू शकतो. भविष्यात असंच करावं लागेल तरचं मानव जातं वाचेल अन्यथा नाही, असं पाशा पटेल यांनी म्हटले आहे.
E20 पेट्रोलचं सरकारकडून समर्थन
केंद्र सरकारकडून E20 पेट्रोलमुळं भारताच्या स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे पाऊल टाकलं जात असल्याचं सांगितलं जातंय. या निर्णयामुळं 1 लाख कोटींच्या परकीय चलन वाचले आहे. 1.18 लाख कोटी रुपयांची उलाढाल इथेनॉल उद्योगात झाली.याचा फायदा शेतकऱ्यांना देखील झाला, असं सरकारकडून सांगण्यात आला. कार्बन उत्सर्जन कमी झालं, असंही सरकारनं म्हटलंय.
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.