आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी माजी दिग्गजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग-11! या गोलंदाजाला दिली संधी

टीम इंडिया (Team india) सध्या वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. संघात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Head Coach Gautam Gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघाची कामगिरी लवकरच सुधारावी लागेल, जेणेकरून कोणाकडूनही कठीण प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत.

दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jafar) यांनी आगामी आयसीसी वनडे विश्वचषक 2027 (ICC ODI World Cup 2027) साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी एका दिग्गज वेगवान गोलंदाजाला देखील संधी दिली आहे.

सलामीवीर (ओपनर) म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाही वसीम जाफर यांनी रोहित शर्माला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. अलीकडेच रोहितने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच, स्पिन अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja or Axar Patel) किंवा अक्षर पटेल या दोघांपैकी एकाची निवड होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत वसीम जाफर यांनी आपल्या संघात अक्षर पटेलला संधी दिली आहे. अक्षरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नाही. परंतु, तरीही वसीम जाफर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान दिले आहे. शमीने अलीकडच्या काळात देशांतर्गत (डोमेस्टिक) क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) सध्या वनडे संघाचा भाग नाही. मात्र, संघाची सध्याची कामगिरी पाहता सिराजचे संघात लवकरच पुनरागमन होऊ शकते. जाफर यांनी 2023 च्या विश्वचषक खेळलेल्या संघातील बहुतांश खेळाडूंवर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना संधी दिली आहे.

Comments are closed.