‘व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर…’; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फ

परभणी क्राईम न्यूज : गंगाखेडचे (Gangakhed) आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचे जावई राजाभाऊ फड (Rajabhau Phad) आणि रासपचे अध्यक्ष व महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची पनवेलमधील (Panvel) एका मालमत्ता खरेदी प्रकरणात तब्बल 14 कोटी 49 लाख रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेऊनही मालमत्ता नावावर न करता उलट जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजाभाऊ फड यांच्या तक्रारीवरून मुंबईतील चार जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parbhani Crime News: काय आहे प्रकरण?

मुंबई येथील ‘टोटल लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या मालकीची कोळखे (ता. पनवेल, जि. रायगड) येथील गट क्रमांक 81, 82 आणि 83 मध्ये मालमत्ता आहे. ही मालमत्ता विक्री करण्यासाठी कंपनीचे संचालक प्रवीण गुप्ता यांनी महादेव जानकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीत संपूर्ण मालमत्तेपैकी दोन हिस्से महादेव जानकर आणि राजाभाऊ फड यांना विक्री करण्याचे निश्चित झाले होते.

Parbhani Crime News: 14 कोटी 49 लाख रुपये उकळले

या मालमत्ता व्यवहाराच्या नावाखाली प्रवीण गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाने 15 जानेवारी 2025 ते 21 एप्रिल 2025 दरम्यान मुंबई येथे तसेच आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या फार्महाऊसवर वेळोवेळी रोख रक्कम आणि आरटीजीएसच्या  माध्यमातून तब्बल 14 कोटी 49 लाख 85 हजार 975 रुपये स्वीकारले. या बदल्यात 50 टक्के हिस्सा म्हणजे 49 गुंठे जागा (ज्यामध्ये पाच वेअरहाऊस, एक साडी शॉपचे बांधकाम आणि मोकळी जागा समाविष्ट आहे) 15 कोटी रुपयांत देण्याचे ठरवून तसा ठरावही करण्यात आला होता.

परभणी क्राईम न्यूज : खरेदी पूर्ण न केल्याने जीवे मारण्याची धमकी

साडेचौदा कोटींपेक्षा जास्त रक्कम स्वीकारूनही गुप्ता कुटुंबाने या मालमत्तेचे खरेदीखत किंवा फेरफार करून दिले नाही. राजाभाऊ फड यांनी वारंवार खरेदीखत करून देण्याची विनंती केली असता, प्रवीण गुप्ता यांनी त्यांना फोनवर दमदाटी केली. “परत फोन केला किंवा माझ्याकडे आलास तर तुला सोडणार नाही, जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नको, आपला व्यवहार विसरून जा अन्यथा तुझी हत्या होईल,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

Parbhani Crime News: मुंबईतील चौघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी राजेभाऊ श्रीराम फड (वय 48, रा. बनपिंपळा, ता. गंगाखेड) यांनी 25 जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ‘टोटल लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रा. लि.’ कंपनीचे संचालक प्रवीण गुप्ता, त्यांची पत्नी मंजू गुप्ता, मुलगा अंकित गुप्ता आणि सून संजना गुप्ता (सर्व रा. मुंबई) यांच्याविरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो…; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

Comments are closed.