ऑफिस पॉलिटिक्स आणि नकारात्मकतेपासून स्वतःला कसे दूर ठेवाल?





ऑफिसमध्ये काम करताना आजूबाजूला नकारात्मक वातावरण, गॉसिप किंवा ताणतणाव असणे अतिशय सामान्य आहे. परंतु, याचा परिणाम स्वतःच्या मानसिक शांततेवर आणि कामाच्या दर्जावर होऊ न देणे महत्त्वाचे असते. ऑफिस पाॅलिटिक्सपासून स्वत:ला दूर ठेवत आयुष्यात सकारात्मक कसे राहावे यासाठी काही खास टिप्स पाहूयात.

  • सतत काही ना काही तक्रारी करणाऱ्या सहकाऱ्यांशी कामापुरतेच बोलावे. अशा व्यक्तींशी वैयक्तिक गोष्टी शेअर करू नयेत.
  • ऑफिसमध्ये तुम्ही कामासाठी आला आहात हे नेहमी लक्षात ठेवा. दिवसभरातील कामांची यादी तयार करा आणि ती पूर्ण करण्यावर भर द्या, म्हणजे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही.
  • स्वतःच्या छोट्या-छोट्या यशाचा आनंद नक्की घ्या तसेच इतरांच्या चांगल्या कामाचे मनमोकळेपणाने कौतुक करा, यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  • तुमचे ऑफिस डेस्क स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे.
  • डेस्कवर एखादे छोटे रोप, कुटुंबाचा फोटो किंवा प्रेरणादायी सुविचार ठेवा. यामुळे पाहताच मन प्रसन्न होईल.
  • सतत स्क्रीनसमोर बसण्याऐवजी दर 1 ते 2 तासांनी 5 मिनिटांचा ब्रेक घेत राहा. थोडे चाला, पाणी प्या किंवा दीर्घ श्वास घेऊ शकता.
  • लंच ब्रेक दरम्यान डेस्कवर बसून काम करण्याऐवजी मोकळ्या हवेत किंवा सकारात्मक मित्रांसोबत वेळ घालवा.
  • एखाद्याने तुमच्यावर किंवा कामावर टीका केली तर रागवण्याऐवजी शांत राहून त्याकडे एक फीडबॅक म्हणून पाहता येईल.
  • तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम किंवा इतरांचे अनावश्यक ताण स्वतःच्या डोक्यावर घेणे टाळा.
  • ऑफिसमधील ताण आणि नकारात्मकता ऑफिसच्या दारातच सोडून घरी या. घरी आल्यावर कौटुंबिक वेळ, छंद आणि व्यायामाला महत्त्व द्या.

हेही वाचा – भारतीय घरात ‘पाहुणे येणार’ म्हटलं की सुरू होणाऱ्या 10 गोष्टी



Comments are closed.