अखेर मांडवली! रायगडात गोगावले तर नाशकात महाजन पालकमंत्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर अखेर मांडवली झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी शिंदे गटाचे भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महायुती सत्तेवर आल्यापासून रायगड व नाशिकचे पालकमंत्री पद सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले होते. रायगडसाठी पर्यायाने गोगावलेंसाठी एकनाथ शिंदे गट सुरुवातीपासूनच आग्रही होता. पालकमंत्री होणार या अपेक्षेने गोगावले यांनी दोन वेळा नवे कोटही शिवले. शिंदेंनी दिल्लीवाऱ्या करून अमित शहांपुढे साकडे घातले. परंतु अजित पवार गटाचे सुनील तटकरे त्यांच्या कन्या आदिती तटकरेंना ते पद मिळावे यासाठी अडून बसल्याने  निर्णय अडला होता.

n नाशिकच्या पालकमंत्री पदाचा घोळही तसाच होता. तिथे भाजपकडून गिरीश महाजन तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांनी दावा केला होता. दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. दुसरीकडे पालकमंत्री नेमला न गेल्याने दोन्ही जिह्यांतील विकास कामांवरही परिणाम झाला होता.

Comments are closed.