इतिहासात प्रथमच… टाटा समूहाची बैठक रद्द.

नवी दिल्ली

टाटा सन्सची 108 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अर्थात एजीएम बैठक मंगळवार 18 ऑगस्ट रोजी होणार होती. पण कोरम न भरल्यामुळे बैठक होऊ शकली नाही. टाटा समूहाच्याबाबतीत अशी घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे, असे सांगितले जाते.

चेअरमन एन. चंद्रशेखरन आणि काही संचालक मंडळातील संचालक बॉम्बे हाऊसमध्ये होते तर नोएल टाटा व मेहली मिस्त्राr हे बैठकीला ऑनलाइन सामील झाले. टाटा सन्सचे दोन प्रमुख ट्रस्टीमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट व सर रतन टाटा ट्रस्ट यांचा समावेश आहे. या दोहेंकडे मिळून टाटा सन्समध्ये बहुमताइतकी हिस्सेदारी आहे. एजीएम बैठकीत या दोन्हींतील ट्रस्टींची हजेरी आवश्यक होती. ती न झाल्याने बैठक होऊ शकली नाही.

 

 

Comments are closed.