रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकात खेळणार का? यावर BCCI गंभीर, आगरकर-लक्ष्मण यांच्या उपस्थितीत निर्णय घेणार!

भारतीय क्रिकेट रसिकांसाठी गुरूवारचा दिवस (3 ऑगस्ट) विशेष असणार आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) उच्चस्तरीय बैठकीत भारताच्या अलीकडील कामगिरीवर आणि रोहित शर्माच्या भविष्यावर चर्चा होणार आहे. या चर्चेला गौतम गंभीर, अजित आगरकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह दोन्ही कर्णधार उपस्थित राहणार आहेत.
भारतीय वरिष्ठ पुरुष संघाच्या आयर्लंड, इंग्लंड आणि श्रीलंका येथील कामगिरीचा आढावा घेणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे या बैठकीत त्याबद्दल आणि भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 जवळ आला असताना BCCI ची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर, मुख्य निवडकर्ता आगरकर आणि सेंटर ऑफ एक्सलेन्सचे प्रमुख लक्ष्मण यांचा सहभाग असणार आहे. या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा विषय रोहित शर्मा असणार आहे. तसेच या बैठकीला वनडे-कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि टी20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हे दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्या होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत रोहितच्या भविष्याबाबत चर्चा होऊ शकते; यापूर्वी त्याच्या 2027 च्या विश्वचषकातील सहभागाच्या शक्यतेबाबत बोर्ड आणि निवड समिती यांच्यात चर्चा झाली आहे. ही बैठक झाल्यानंतर त्याच्या संघातील उपस्थितीबाबत अधिक स्पष्टता येईल.
भारताने इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा वनडे सामना लॉर्ड्सवर खेळला होता. तो माजी कर्णधाराचा शेवटचा सामना असेल, हे वृत्त BCCI ने फेटाळले होते. त्यामुळे या बैठकीत रोहितच्या संघातील जागेबाबत, तसेच आगरकर-लक्ष्मण यांच्या भविष्याबाबतची योग्य निर्णय घेतले जाणार आहेत.
टीम इंडियाच्या युरोपातील खराब कामगिरीवर चर्चा
भारताची मर्यादित षटकांमधील अलीकडची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. आयर्लंडविरुद्धचा पराभव आणि इंग्लंडविरुद्धची व्हाईट-बॉल मालिका गमावल्यानंतर, संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सलग दोन टी20 विश्वचषक जिंकलेल्या संघाला युरोप दौऱ्यातील सहा सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता.
आगामी मालिकांवरही चर्चा
या बैठकीत भारताच्या पुढील वाटचालीबद्दलही चर्चा होणार आहे. भारत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका, पाच सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या आव्हानात्मक दौऱ्यासाठी संघाची तयारी आणि निवड याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर बैठकीत जागतिक कसोटी चॅम्पियनशीप (WTC) चक्रातील संघाच्या कामगिरीबाबत आणि स्थानावरही चर्चा होईल. कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी भारताला आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. (in BCCI meeting Rohit Sharma’s future could be discussed Gautam Gambhir Ajit Agarkar)
Comments are closed.