पाकिस्तानच्या खेळाडूंनी नाकारली इंग्लंडच्या राजाची भेट; पिसीबी विरोधात थेट पवित्रा! काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने एका डावाने गमावला होता. त्यानंतर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानला 194 धावांनी पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत 7 खेळाडूंना संघाबाहेर केलं. दरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंनी किंग्स चार्ल्सला भेटण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा पूर्णपणे फ्लॉप शो पाहायला मिळाला. हा सामना पाकिस्तानने 194 धावांनी गमावला. हा सामना सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अॅक्शन घेत 7 खेळाडूंना संघाबाहेर केलं. मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी पाकिस्तान संघाला आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना क्लेरेंस हाऊसमध्ये किंग्स चार्ल्सची भेट घेण्यासाठी बोलवलं होतं. ही भेट 2 सप्टेंबरला पार पडली.
टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने संघाबाहेर केलेल्या 7 खेळाडूंपैकी 4 खेळाडू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पण, एका खेळाडूने पीसीबीला विरोध करत किंग्स चार्ल्सची भेट घेण्यास नकार दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाबाहेर केलेल्या खेळाडूंपैकी खुर्रम शहजाद, मुहम्मद अवैस जफर, आमिर जमाल आणि अली उस्मान या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या दौऱ्यावर फ्लॉप शो केल्यानंतर केवळ खेळाडू नव्हे, तर मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकालाही आपलं पद गमवावं लागलं आहे. मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुलला संघाबाहेर करण्यात आलं आहे. सर्फराज अहमदला संघाबाहेर केल्यानंतर, त्याच्या जागी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचा मुख्य प्रशिक्षक माईक हेसनकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते मिस्बाह उल हकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.
Comments are closed.