तामिळनाडूतील द्रमुक नेते एन. नेहरूंविरुद्ध एफआयआर.
चेन्नई
तामिळनाडूत द्रमुक विरुद्ध टीव्हीके यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी इशारा दिल्यावर मंगळवारी राज्यातील दक्षता संचालनालयाने माजी मंत्री अन् द्रमुक नेते के.एन. नेहरू यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. सरकारी निविदांमध्ये घोटाळे करत लाच मिळविल्याचा आरोप नेहरु यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना मुख्य आरोपी ठरविण्यात आले आहे. नेहरू यांच्यासोबत त्यांचे दोन भाऊ, दोन माजी आमदार, सरकारी अधिकारी आणि कंत्राटदारांनाही आरोपी करण्यात आले आहे.
Comments are closed.