आसाममधील नौगाँग पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
गुवाहाटी: काँग्रेसने आसामच्या नौगाव लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी आमदार शिवमोनी बोरा यांना उमेदवारी जाहीरक् केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नौगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बोरा यांच्या नावाला मंजुरी दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
नौगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा तत्कालीन खासदार प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर झाली आहे. बोरदोलोई हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नौगाव मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. भजपचे उमेदवार सुरेश बोरा यांना पराभूत करत या मतदारसंघात विजय मिळविला होता.
परंतु नंतर बोरदोलोई यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता, त्यानंतर बोरदोलोई यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. बोरदोलोई यांच्या राजीनाम्यामुळे नौगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
Comments are closed.