विश्वविजेत्या भारताची जपानविरुद्ध अब्रू थोडक्यात वाचली! अवघ्या 2 धावांनी विजय

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जपान विरुद्ध प्रथमच ऐतिहासिक विजय मिळवले. क्रिकेटमध्ये भारत आणि जपानचे संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. पावसामुळे सामन्यातील षटकांची संख्या कमी करून ती प्रति संघ पाच षटके इतकी करण्यात आली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत, भारतीय संघाने पाच षटकांत 4 बाद 32 धावा केल्या.

या माफक आव्हानाचा पाठलाग करताना जपानच्या संघाने जिद्दीने झुंज दिली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जपानी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. जपानला पाच षटकांत 3 बाद 30 धावाच करता आल्या.

जपानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. मात्र, त्यांना आवश्यक धावा करता आल्या नाहीत आणि भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. भारत आणि जपान यांच्यातील हा पहिलाच क्रिकेट सामना होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.