ज्ञानेश कुमारच नाही, तर पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल; इतका भयंकर वणवा देशात पेटतोय, संजय राऊत कडाडले
भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थोड्याच वेळात मुंबईत शिवसेना-मनसेचा गर्जना मोर्चा निघणार आहे. या मोर्चापूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही सुरुवात असून देशात ठिणगी पडताना दिसत आहे. 10 ऑक्टोबरला जंतरमंतरला मोठे आंदोलन होत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, फक्त ज्ञानेश कुमारच नाही, तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल इतका भयंकर वणवा देशात पेटण्याची भीती मला वाटतोय, असे संजय राऊत म्हणाला.
Comments are closed.