बोरिवलीतून 10 कोटींचे हेरॉईन जप्त
मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ड्रग तस्करांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली असून बोरिवली येथे टाकलेल्या धाडीत पोलिसांनी 10 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा नुकताच जप्त केला आहे.
बोरिवली परिसरात ड्रगचा साठा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रँच, कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे व त्यांच्या सहकाऱयांनी मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त अनिल पुंभारे, कृष्णकांत उपाध्याय, उपायुक्त नवनाथ ढवळे, एसीपी सुरेश मदने या वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पश्चिम येथे सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून 10 कोटी रुपयांचा ‘हेरॉईन’चा साठा जप्त केला. या तस्करीमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड व राजस्थानमधील आरोपी गुंतले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, विश्वास पाटील, बनसोडे, महिला पोलीस अधिकारी सरला थोरात शिंदे, गायकवाड, चोरमले, खांडेकर, खताते, गोवळकर, शिंदे, चव्हाण, जाधव, महिला पोलीस हवालदार लाडे, सानप, वारिक, वरठा, वळतकर, महिला पोलीस शिपाई गोसावी या पोलीस पथकाने भाग घेतला.
Comments are closed.