सरकारने ही डॉक्युमेंटरी गायब करायच्या आधी तुम्ही बघून घ्या! राज ठाकरे यांचे जनतेला आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यात हितसंबंध आहेत. मोदी हे अदानी यांच्या फायद्याचे निर्णय घेतात, असा आरोप विरोधक सातत्याने करतात. हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालानंतर तर अदानींविरोधात देशभरात रान उठले होते. विशेष म्हणजे मोदी आणि अदानी यांच्या हितसंबंधाबाबत एक डॉक्युमेंट्रीही बनली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून ही डॉक्युमेंट्री शेअर केली आहे.

‘द फ्रेंडशिप फाईल’ नावाही ही डॉक्युमेंट्री आहे. 36 मिनिटे आणि 9 सेकंदांच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या संबंधावर भाष्य करण्यात आले आहे. ही डॉक्युमेंट्री राज ठाकरे यांनी शेअर केली आहे. सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या! अशा कॅप्शनसह राज ठाकरे यांनी ही डॉक्युमेंट्री शेअर करत ती पाहण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

Comments are closed.