Ranji Trophy 2026/27 – महाराष्ट्र-बंगाल सामना रोमहर्षक वळणावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रणजी करंडकाच्या एलिट गटातील महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यातील लढत आता रोमहर्षक वळणावर येऊन ठेपलीय. पहिल्या डावात 75 धावांची पिछाडीवर पडलेल्या बंगालने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात उर्वरित 24 षटकांच्या खेळात 4 बाद 76 धावा केल्या असून त्यांच्याकडे अवघ्या एका धावेची आघाडी आहे. त्यामुळे चौथ्या आणि अखेरच्या दिवशी सामन्याचा निकाल काय लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राने पहिल्या डावात 82.5 षटकांत 218 धावा उभारल्या होत्या. बंगालचा पहिला डाव अवघ्या 143 धावांत गुंडाळत महाराष्ट्राने 75 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवशी बंगालच्या फलंदाजांना रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा जोर लावला. तनय सांघवीने दोन विकेट्स घेत बंगालच्या डावाला खिंडार पाडले. प्रदीप दाढे आणि हितेश वाळुंज यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला, मात्र बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलने नाबाद 23 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सूरज जैस्वाल शून्यावर साथ देत आहे.

Comments are closed.