मोदींनी कितीही फासे टाकले तरी शरद पवार आणि त्यांचा पक्ष मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही – संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे. त्यावर नरेंद्र मोदींनी कितीही फासे टाकले तरी शरद पवार आणि त्यांच्या पक्ष मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. शरद पवार आजारी आहेत, पंतप्रधानांनी त्यांची चौकशी केली. लालूप्रसाद यादवदेखील आजारी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आजारी नेत्यांच्या प्रकतीची चौकशी करायला हवी. पण ते सोयीची चौकशी करतात, असे ते म्हणाले.
शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करत सुप्रिया सुळे यांचे नाव घेत त्यांनी संभ्रम निर्माण केला. आजारपणाच्या चौकशीतीही त्यांनी राजकारण केले, त्याबाबत काय बोलायचे?, असे ते म्हणाले. मोदींनी कितीही फासे टाकले तरी शरद पवार आणि त्यांच्या पक्ष मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Comments are closed.