स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू आणि करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा क्रिस्टियानो रोनाल्डे याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या फुटबॉलच्या प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्याने बोलून दाखवली.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोनाल्डो म्हणाला की, पोर्तुगालच्या टीमची नंबर 7 जर्सी आता नव्या पिढीकडे सुपूर्द करण्याची वेळ आली आहे. गेल्या 23 वर्षांपासून ही जर्सी परिधान करणे, तिची रक्षा करणे आणि जगभरातील स्टेडियममध्ये तिचा मान राखणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान होता. ऑगस्ट 2003 मध्ये सुरू झालेला हा प्रवास माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असून, मागे वळून पाहताना मला केवळ गोल किंवा ट्रॉफ्याच दिसत नाहीत, तर परदेशात राहणारे ते प्रवासी दिसतात ज्यांना 90 मिनिटांसाठी आपले पोर्तुगाल अधिक जवळचे वाटले.
रोनाल्डोने पुढे सांगितले की, देशाचे प्रतिनिधित्व करताना मी या जर्सीसाठी आपले सर्वस्व झोकून दिले. काही विजय कधीच विसरता येणार नाहीत, तर काही पराभवांची खंत आजही मनाला टोचते. मी अपयशही पाहिले आणि कठीण प्रसंगही अनुभवले, पण कधीही हार मानली नाही. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी 234 सामन्यांमध्ये 146 गोल नोंदवत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अत्यंत दिमाखदार शेवट केला आहे.
#पाहा | फुटबॉल महान ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली; X (Twitter) वर एक व्हिडिओ रिलीज करते.
(व्हिडिओ: क्रिस्टियानो रोनाल्डो/एक्स) https://t.co/fC0uLyED1e
— ANI (@ANI) 5 नोव्हेंबर 2026
Comments are closed.