शिरीष पै यांची जयंती, दै. ‘मराठा’चा वर्धापन दिन; ठाण्यात रविवारी रंगणार १०३वे कवी संमेलन
‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठी कवितेत रुजवणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांची जयंती तसेच आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’चा वर्धापन दिन याचे औचित्य साधून ठाण्यात रविवार १५ नोव्हेंबर रोजी १०३वे काव्य संमेलन होणार आहे. यानिमित्ताने शिरीष पै व आचार्य अत्रे यांच्या – आठवणींना उजाळा मिळणार आहे.
ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयात सायंकाळी ५.३० वाजता हा काव्य सोहळा रंगणार असून त्याचे आयोजन उद्वेली प्रकाशन, वसंत आणि शांता पटवर्धन विश्वस्त न्यास यांच्या वतीने केले आहे. या कवी संमेल नात माजी न्यायमूर्ती व कवयित्री मृदुला दाढकर यांना ‘शिरीष पै स्मृतिचिन्ह’ देऊन गौरवण्यात येणार आहे. आत्रेय संस्था, परचुरे प्रकाशन तसेच डिंपल प्रकाशन यांच्या सहयोगाने हा पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात येईल. पुस्तक प्रदर्शन काव संमेलन तसेच दै. ‘मराठा’चा वर्धापन दिन या एकत्रित कार्यक्रमात शिरीष पै व आचार्य अत्रे यांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पुस्तक प्रदर्शनात अत्रे व पै यांची गाजलेली पुस्तके ठेवण्यात येतील, अशी माहिती अॅड. राजेंद्र पै यांनी दिली.
यांची उपस्थिती
काव्य संमेलनास विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुखख वक्ते कविवर्य अरुण म्हात्रे आहेत. या सोहळ्यास अत्रे व काव्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन विवेक मेहेत्रे, अनंत जोशी, डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे.
Comments are closed.