हिंदुस्थानने उडवला मलेशियाचा धुव्वा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मलेशियाचा 4-1 असा धुव्वा उडवत विजयाची बोहनी केली. हिंदुस्थानने पिछाडीवरून असे दणक्यात पुनरागमन केले की, मलेशियाला त्यांच्यासमोर गुडघे टेकावे लागले. मलेशियासाठी नुरमिराह झुल्किफलीने सामन्यातील पहिला गोल केला. पण हिंदुस्थानचा संघ हार मानणारा नव्हता. त्यानंतर काही वेळातच मुमताज खानने हिंदुस्थानसाठी पहिला गोल केला. हिंदुस्थानची कर्णधार सलीमा टेटेने त्यानंतर जोरदार आक्रमण केले आणि संघासाठी दुसरा गोल करत आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या तिसऱ्या सत्रात पूजा साहूने 39 व्या मिनिटाला गोल करून संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. 49 व्या मिनिटाला लालरेम्सियामी हमारजोते हिंदुस्थानच्या संघासाठी गोल करून आघाडी 4-1 अशी वाढवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

Comments are closed.