टीम इंडियाचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, पहिल्या हॉकी सामन्यात यजमानांवर 3-2 ने बाजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाने यजमान न्यूझीलंडवर 3-2 गोल फरकाने मात करीत विजयारंभ केला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेतील 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडने आक्रमक खेळ करत हिंदुस्थानवर दबाव निर्माण केला. जोंटी एल्म्सने 25 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत यजमानांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, मात्र हिंदुस्थानने लगेचच प्रत्युत्तर दिले. उत्तम सिंहने त्याच 25 व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात शारदानंद तिवारीने 38 व्या मिनिटाला मैदानी गोल करत हिंदुस्थानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार संजयने 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत हिंदुस्थानची आघाडी 3-1 अशी भक्कम केली. दोन गोलच्या पिछाडीनंतर न्यूझीलंडने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले. सॅम हिहाने 55 व्या मिनिटाला मैदानी गोल करत आघाडी 3-2 अशी कमी केली.

Comments are closed.