श्री समर्थची विजयी आगेकूच
खो-खोच्या अस्सल थरारासह माटुंग्यातील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या मैदानात सुरू झालेल्या प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन आयोजित मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत महिलांच्या गटात ओम समर्थ भारत, श्री समर्थ, शिवनेरी संघांनी जोरदार सलामी दिली.
महिलांच्या गटात ओम समर्थ भारतने संघशक्तीला 10-7 असे नमवून विजयी सलामी दिली. श्री समर्थने अमर हिंदवर 9-7 अशी मात केली, तर शिवनेरीने वैभवला 9-7 असे रोखले. ओम साई ईश्वरने आर्य सेना संघाला 9-6 असे पराभूत केले. सरस्वती कन्येने मात्र पहिल्या सामन्यातील विजेत्या ओम समर्थ भारतला 9-6 अशी धूळ चारली. पुरुषांमध्ये ओम साईश्वरने सरस्वती ‘ब’वर 15-13 अशी मात करत दोन गुणांनी बाजी मारली. मुंबई संघातील स्थानासाठीच्या या निवड चाचणीत पहिल्याच दिवशी खेळाडूंनी आपली ताकद दाखवत स्पर्धेचा रंग चढवला.
Comments are closed.