महात्मा फुले मंडईची नवीन इमारत कधी तयार होणार – हायकोर्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईच्या नवीन इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. यास्मिन हिंगोरा यांनी अॅड. अनिल अंतुरकर व अॅड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज मार्पेटमध्ये गाळा होता. हे मार्केट मोडकळीस आल्याने त्याचे बांधकाम तोडण्यात आले. हिंगोरा यांना कांजुरमार्ग येथे पर्यायी जागा देण्यात आली. येथे जवळपास जागा देण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

Comments are closed.