मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना मुदतवाढ मिळणार
भीषण दुष्काळी स्थिती आणि डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भातील प्रस्ताव पुढील आठवडय़ात पंतप्रधान कार्यालयाला सादर होणार असल्याचे समजते. अग्रवाल हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ मिळाल्यास मुख्य सचिव पदाचे दावेदार असलेल्या संजय सेठी, मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर यांना काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.
Comments are closed.