बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर सकाळऐवजी दुपारी होणार; परीक्षेची तारीख कायम, अन्य वेळापत्रकात कोणताही बदल नाही
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली आहे. हा पेपर 17 फेब्रुवारी 2027 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होईल. परीक्षेची तारीख कायम असून केवळ सत्र बदलले आहे, अशी माहिती मंडळाने दिली. मूळ वेळापत्रकानुसार हा पेपर त्याच दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार होता.
बारावीच्या इतर विषयांच्या आणि दहावीच्या सर्व लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतल्या जाणार आहेत. संकेतस्थळावरील वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाकडून पाठवलेले छापील वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी पेपरची तारीख, सत्र आणि वेळ यांची शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडील छापील वेळापत्रकातून खात्री करावी, असेही मंडळाने सांगितले
Comments are closed.