देवेन भारती, आशुतोष डुंबरे यांना पोलीस महासंचालकपदी बढती; मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तपदावर कायम
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना आज पोलीस महासंचालक पदी बढती देण्यात आली. बढती देत असताना दोन्ही अधिकाऱ्यांना मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले.
1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती व आशुतोष डुंबरे हे अपर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत होते. त्यांना महासंचालकपदी बढती मिळेल अशी चर्चा होती, पण आदेश काही निघत नव्हते. अखेर आज गृह विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश जारी केले. महासंचालक पदी बढती देऊन देवेन भारती यांना मुंबई पोलीस आयुक्त पदी तर डुंबरे यांना ठाणे पोलीस आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले आहे.
Comments are closed.