कर्जासाठी किडनी विकली! सावकाराने जमीनही हडपली!! फडणवीसांच्या विदर्भात शेतकऱ्याची फरफट… सरकारचा कारवाईचा आदेश कागदावरच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिह्यातील नागभीड तालुक्यातील मिन्थुर येथील किडनी विकावी लागलेल्या शेतकऱयाचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या रोशन पुडे यांना कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हे तर ज्या शेतजमिनीवर ते उदरनिर्वाहासाठी शेती करीत होते, ती जमीनही सावकाराने गिळल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात शासनाकडून निघालेला आदेश अद्यापही कागदावरच असल्याचे रोशन यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट बाहेर काढणे आणि जिह्यातील अवैध सावकारीचा फास आवळणे हा गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळाच्या आगामी नागपूर अधिवेशनादरम्यान न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रोशन पुडे हे आपल्या गावातून पत्नी, दोन मुले आणि वडिलांसह चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा देत दाखल झाले होते. मात्र, चंद्रपूरला पोहोचण्यापूर्वीच नागभीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱयांसह त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. येथे त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर रोशन पुडे यांनी आपल्या पुटुंबीयांसह निवासी उपजिल्हाधिकाऱयांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

आंदोलनाचा इशारा

पीडित शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशनादरम्यान आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार रोशन पुडे यांनी व्यक्त केला आहे.

रोशन पुडे यांच्या म्हणण्यानुसार, खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. मात्र, किडनी विपूनही त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत. सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी आपण कसत असलेल्या शेतजमिनीवरही सावकारांनी ताबा मिळवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे पुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणात शासनाने जमिनीचा ताबा मिळवून देण्याबाबत आदेश दिल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात जमिनीचा ताबा मिळालेला नाही.

रॅकेटची सखोल चौकशी करा!

शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्यापर्यंत परिस्थिती का ओढवली, या प्रकरणामागे कोणते आर्थिक व्यवहार आणि सावकारीचे जाळे आहे तसेच या प्रकरणाशी संबंधित कथित आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटची सखोल चौकशी का होत नाही? असे अनेक प्रश्न रोशन पुडे यांनी उपस्थित केले आहेत.

Comments are closed.