अधिवेशनात शेतकऱ्यांचा एल्गार, 9 डिसेंबरला विधान भवनावर धडकणार ट्रॅक्टर मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विदर्भातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर विरोधकांच्या वतीने ‘न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात येणार आहे. 4 डिसेंबरला बुलढाण्यातील शेगाव येथून मोर्चाला सुरुवात होऊन 9 डिसेंबरला नागपुरात धडकेल. यात राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर मोठया संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

या मोर्चा संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूरांचे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. सरकारकडून अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱयांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी, त्याचबरोबर इतरही अनेक मागण्या यावेळी करण्यात येणार आहे. या मागण्यांचे पत्र शरद पवार यांनी आधीच मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. मात्र, त्यावर सरकारने पुठलीही पृती न केल्याने हा मोर्चा काढून त्याबाबत लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मोर्चासंबंधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा झाल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, या मोर्चात सहभागी होण्याचे सर्वांनाच आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.