अशोक लेलँडच्या 28 आसनी स्वदेशी चिलखती लष्करी वाहनाला हिरवा झेंडा, सैनिकांचे गोळी आणि स्फोटकांपासून संरक्षण
हिंदुस्थानने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, स्वदेशी चिलखती लष्करी वाहनाचे अनावरण केले आहे. प्रमुख वाहन उत्पादक कंपनी अशोक लेलँडने या 28 आसनी चिलखती वाहन विकसित आणि उत्पादित केले असून त्याला 18 नोव्हेंबरला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या नवीन वाहनामुळे सुरक्षा दलांच्या हालचाली अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार असून सैनिकांचे गोळी आणि स्फोटकांपासून संरक्षण होणार आहे.
लष्करी वाहनातून एकाच वेळी 28 जवान सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. हे वाहन बुलेटप्रूफ आणि स्फोटरोधक असून, गोळीबार तसेच भूसुरुंगांच्या हल्ल्यांपासून जवानांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. हे एटीटी वाहन सीएमव्हीआर प्रमाणित असून त्यात रन फ्लॉ सिस्टीम, पीटीझेड कॅमेरे, कमांड आणि कंट्रोल सिस्टीम, फोटांच्या माउंटसह 360 डिग्री फिरणारे टरेटची सुविधा उपलब्ध आहेत. डोंगराळ, दुर्गम आणि सीमावर्ती भागातील खडतर रस्त्यांवरून सहज धावण्यासाठी या वाहनाची विशेष रचना करण्यात आली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत या वाहनाची संपूर्ण रचना आणि निर्मिती हिंदुस्थांमध्येच करण्यात आली आहे.
तरुण अधिक सुरक्षित आहे
पुलवामा हल्ल्यानंतर संरक्षण दलाच्या गरजा लक्षात घेऊन अशोक लेलँडने हे विशेष लष्करी वाहन तयार केले आहे. या नवीन चिलखती बसमुळे संवेदनशील भागात जवानांची ने-आण करणे अधिक सुरक्षित होणार असून, लष्कर आणि निमलष्करी दलांच्या ताफ्यात मोलाची भर पडली आहे.
Comments are closed.