वसई-विरार पालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुधारा, सभापतींचे प्रशासनाला आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महापालिका आरोग्य विभागातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिव आरोग्य सेनेने पुढाकार घेतला आहे. शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती नीलेश देशमुख यांची भेट घेऊन आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्याची मागणी केली. यानंतर सभापतींनी तातडीने प्रशासनाला आदेश देऊन रुग्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले.

शिव आरोग्य सेनेचे समन्वयक सागर वाघ, सहसमन्वयक चिमण सोळंकी, सचिव नितेश कुवेसकर यांनी आरोग्य समितीचे सभापती नीलेश देशमुख यांच्यासमोर आरोग्य व्यवस्थेतील समस्या, नागरिकांना होणारा त्रास तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत विविध मुद्दे निदर्शनास आणून दिले. यानंतर नीलेश देशमुख यांनी या विषयांची दखल घेत यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

सातत्याने पाठपुरावा करणार

नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून महानगरपालिका आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर होईपर्यंत शिव आरोग्य सेना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.

Comments are closed.