भाजपने शिंदे गटाला ‘गाढव’ बनवले, अलिबागमधील आंदोलनात मुखवटे लावले
शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी भाजपचे जिल्हा चिटणीस अॅड. महेश मोहिते यांच्यावर केलेल्या टीकेवरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपने शिंदे गटाविरोधात अलिबाग शहरात जोरदार आंदोलन करत केणी यांच्या प्रतिमेला गाढवाचे मुखवटे घालून त्यांची धिंडच काढली. भाजपने शिंदे गटाला दिलेल्या झटक्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथे बोलताना, ‘पेणमध्ये पुढील आमदार आमचाच असेल’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे जिल्हा चिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी ‘आपल्याकडे अलिबाग मतदारसंघ राहतोय का, हे आधी पाहावे’, असा टोला लगावला होता. या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे राजा केणी यांनी मोहिते यांच्यावर टीका केली होती. तसेच मोहिते यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी अलिबाग शहरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने सोमवारी अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले. यावेळी राजा केणी यांच्या प्रतिमेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी त्यांचे फोटो फाडले आणि गाढवाच्या रूपातील बॅनर झळकावले.
Comments are closed.