वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी द्विशतकामुळे भारताने 14.2 षटकांत गाठले 250 धावांचे लक्ष्य, आशिया कपमध्ये युएईला नमवत पोहोचला उपांत्य फेरीत

दोहामध्ये सुरू असलेल्या पुरुष संघांच्या आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत आज (२४ नोव्हेंबर) वैभव सूर्यवंशीचे वादळ आले. भारताच्या या युवा फलंदाजाने युएईविरुद्धच्या गट फेरीतील सामन्यात जलद द्विशतकी खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भुमिका निभावली. त्याने ५३ चेंडूंत ७ चौकार आणि २८ षटकारांच्या सहाय्याने २०४ धावा केल्या. त्याच्या या कहर फलंदाजीमुळे भारताने १४.२ षटकांतच २५० धावांचे लक्ष्य गाठले आणि युएईला ७ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.