वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम! अवघ्या 52 चेंडूंमध्ये झळकावले द्विशतक
हिंदुस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावत लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
दोहा येथे झालेल्या या सामन्यात यूएईने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 बाद 249 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक, 28 चेंडूंमध्ये शतक, 40 चेंडूंमध्ये दीडशतक आणि 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले.
वैभवने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 28 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 385.71 इतका होता.
या कामगिरीसह वैभवने लिस्ट ए क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडीत काढले. यापूर्वी न्यूझीलंडच्या चॅड बोवेस याच्या नावावर 103 चेंडूंमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम होता. वैभवने हा विक्रम तब्बल 51 चेंडूंनी मागे टाकला. तसेच सर्वात वेगवान शतकाचा आणि दीडशतकाचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. वैभवच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थान अ संघाने अवघ्या 14.2 षटकांत 3 गडी गमावून 254 धावा करत सामना ७ विकेट्सने जिंकला.
Comments are closed.