शुभमन गिलची मागणी आयसीसीला आमान्य
पहिली कसोटी हिंदुस्थान जिंकेल, असे बऱयाच जणांना वाटत होते, पण हा सामना अनिर्णीत राहिला आणि त्यानंतर हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिलने आयसीसीकडे एक मागणी केली. आयीसीसीने चेंडूला लाळ लावून चमकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गिलने केली होती. पण ही गिलची मागणी आयसीसीला अमान्य असल्याचे आता समोर आले आहे.
गिल काय म्हणाला…
पहिल्या सामन्यात कुकाबुरा चेंडू हा लवकर नरम होत होता. त्यामुळे जर चेंडूवर लाळ लावली तर तो चमकेल आणि गोलंदजांना त्याची मदत होईल. त्यामुळे चेंडूला लाळ लावून चमकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मी आयसीसीला केली आहे. आयसीसीने गोलंदाजांच्या हिताचाही विचार करावा, असे मला वाटते. त्यामुळे आयसीसी यावर काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे, असे गिलने म्हटले होते.
आयसीसीचे काय म्हणणे आहे…
जेव्हा 2020 मध्ये कोरोना आला होता तेव्हा खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यानंतर खेळाडूंचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी आम्ही आमचा निर्णय कायम ठेवला होता आणि यापुढेही आम्ही हा नियम कायम ठेवण्यावर ठाम आहोत. कारण आमच्यासाठी खेळाबरोबरच खेळाडूंची सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे असे आयसीसीमधील सूत्रांनी सांगितले.
Comments are closed.